सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:53 IST2025-09-19T14:51:23+5:302025-09-19T14:53:24+5:30
Government Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
अभियांत्रिकी पदवीधरांना सरकारीनोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने तांत्रिक अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कंपनीची अधिकृत वेबसाईट ecil.co.in ला भेट द्यावी.
या भरती अंतर्गत एकूण १६० जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ६५ जागा सामान्य श्रेणी, १६ जागा इडब्लूएस, ४३ जागा ओबीसी, २४ जागा एससी आणि १२ जागा एसटीसाठी राखीव आहेत. या भरती प्रक्रियेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.
पात्रता
अर्जदारांकडे ECE/ETC/E&I/इलेक्ट्रॉनिक्स/EEE/इलेक्ट्रिकल/CSE/IT/मेकॅनिकल शाखांमध्ये किमान ६० टक्के गुणांसह बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर, ओबीसी, एससी आणि एसटीसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
अर्जदारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल. निवड एका वर्षासाठी कराराच्या आधारावर केली जाईल. कामगिरीनुसार, करार चार वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. रिक्त पदांबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.
अर्जप्रक्रिया
- सर्वात प्रथम ईसीआयएलची अधिकृत वेबसाइट, ecil.co.in ला भेट द्यावी.
- होम पेजवर Career Section पर्याय निवडा.
- त्यानंतर Technical Officer Recruitment या पर्यायावर क्लिक करा.
- तिथे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.