१०वी उतीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी भरती जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:48 IST2026-04-08T20:47:06+5:302026-04-08T20:48:29+5:30
CRPF Bharti 2026: अर्ज कधीपासून करता येणार? जाणून घ्या...

१०वी उतीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी भरती जाहीर
CRPF Bharti 2026:सरकारीनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. Central Reserve Police Force (CRPF) ने कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समॅन आणि पायनियर) पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ९,१९५ पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून, १९ मे २०२६ ही अंतिम तारीख आहे. अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच, उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ड्रायव्हर आणि मेकॅनिकसारख्या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र किंवा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा
ड्रायव्हर पदे: २१ ते २७ वर्षे
इतर पदे: १८ ते २३ वर्षे
आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत
SC/ST: ५ वर्षे
OBC: ३ वर्षे
माजी सैनिकांना नियमानुसार सवलत
शारीरिक पात्रता
पुरुष उंची: १७० सेमी
महिला उंची: १५७ सेमी
पुरुष छाती: ८० सेमी + ५ सेमी फुगवटा
चाचणी:
पुरुष: ५ किमी - २४ मिनिटांत धावणे
महिला: १.६ किमी - ८.५ मिनिटांत धावणे
अर्ज शुल्क
सामान्य / OBC / EWS (पुरुष): ₹१००
SC / ST / महिला / माजी सैनिक: मोफत
निवड प्रक्रिया
फिजिकल टेस्ट (PET/PST)
संगणक आधारित परीक्षा (CBT)
ट्रेड टेस्ट
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अंतिम मेरिट लिस्ट CBT परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी rect.crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी (Registration) करावी, त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.