सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:03 IST2025-06-11T15:01:21+5:302025-06-11T15:03:14+5:30
Central Bank of India Recruitment: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली. उमेदवाराना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे. अर्ज करण्यापूर्वी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
इच्छुक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये स्टायपेंड मिळेल. या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असायला हवा. याशिवाय, उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. एससी/एसटी/ओबीसी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट देण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे, तीन टप्प्यांत उमेदवारांची निवड केली जाईल. सुरुवातीला उमेदवाराची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची स्थानिक भाषा चाचणी होईल. शेवटच्या टप्प्यात उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज शुल्क
पीडब्ल्यूबीडी उमेदवार: ४०० रुपये
एससी/एसटी/सर्व महिला उमेदवार/ईडब्ल्यूएस: ६०० रुपये + जीएसटी
इतर सर्व उमेदवार: ८०० रुपये + जीएसटी
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
अर्ज कसा करायचा?
- सर्वात प्रथम उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in येथे भेट द्यावी.
- होमपेजवर Apprentice Recruitment 2025 हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करा आणि लॉगिन आयडी तयार करा.
- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क भरा.
- अर्ज दाखल केल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट स्वत:जवळ ठेवा.