BHEL Recruitment 2022 : इंजिनिअरसह अन्य पदांवर मोठी भरती, ७१ हजारांपर्यंत मिळणार वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 02:45 PM2022-01-07T14:45:36+5:302022-01-07T14:46:00+5:30

BHEL Recruitment 2022, Sarkari Naukri 2022 : पाहा कसा करता येईल अर्ज. कोणती आहे अखेरची तारीख.

bhel recruitment sarkari naukri 2022 notification engineer supervisor posts check details | BHEL Recruitment 2022 : इंजिनिअरसह अन्य पदांवर मोठी भरती, ७१ हजारांपर्यंत मिळणार वेतन

BHEL Recruitment 2022 : इंजिनिअरसह अन्य पदांवर मोठी भरती, ७१ हजारांपर्यंत मिळणार वेतन

Next

BHEL Recruitment 2022, Sarkari Naukri 2022 : भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेडने (BHEL) सिव्हिल डिसिप्लिनमध्ये इंजिनिअर आणि सुपरवायझर पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कंपनीनं ३६ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी कंपनीनं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर pswr,bhel.com वर एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. उमेदवारांना आवश्यक माहिती पडताळून ११ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.

यादरम्यान ज्यांची निवड केली जाईल, त्यांना भारतातील प्रकल्पांच्या ठिकाणी एका निश्चित कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट pswr,bhel.com वर अर्ज करता येऊ शकेल. ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख ११ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. तर ऑफलाइन माध्यमातून १४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

किती असेल वेतन
यात इंजिनिअर पदांसाठी १० आणि सुपरवायझर पदांसाठी २६ उमेदवारांची निवड करण्यात येईल. इंजिनिअर पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा ७१,०४० रुपये वेतन देण्यात येईल. याशिवाय सुपरवायझर पदांवर नियुक्ती करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा ३९६७० रुपये वेतन देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.

Web Title: bhel recruitment sarkari naukri 2022 notification engineer supervisor posts check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app