AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:19 IST2025-08-28T15:17:18+5:302025-08-28T15:19:57+5:30
AAI Junior Executive Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरतीची घोषणा केली. आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छूक इच्छुक उमेदवार aai.aero या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती अंतर्गत ९७६ रिक्त पदे भरली जाणार आहेत, ज्यात ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर)- ११ पदे, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-सिव्हिल)- १९९ पदे, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल)- २०८ पदे, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)- ५२७ पदे आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान)- ३१ पदांचा समावेश आहे.
पात्रता
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी या विषयात बॅचलर पदवी आणि इतर आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी GATE स्कोअर देखील अनिवार्य आहे. उमेदवाराचे कमाल वय २७ सप्टेंबर २०२५ रोजी २७ वर्षे असावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.
पगार
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार. दरम्यान, भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावा.
अर्ज कसा करायचा?
- सर्वातप्रथम, उमेदवारांनी www.aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर करिअर विभागात Apply Online क्लिक करा.
- ईमेल आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करा.
- नोंदणीकृत क्रमांकाने लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म भरा.
- सर्व शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा.
- आवश्यक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.
- GATE नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
- अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.