शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

आयटी क्षेत्रामध्ये चालू वर्षात १.३५ लाख नव्या नोकऱ्यांची संधी; महसूल जाणार ३१५ अब्ज डॉलरवर ; नॅसकॉमचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा महसूल ६.१ टक्क्यांनी वाढून ३१५ अब्ज डॉलरच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचेल, असा विश्वास ‘नॅसकॉम’ने मंगळवारी व्यक्त केला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र रोजगाराचे प्रमुख क्षेत्र राहिले आहे. यंदा येथे १.३५ लाख तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 

नॅसकॉमचे अध्यक्ष राजेश नांबियार यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या प्रगतीबाबत माहिती देताना सांगितले की, हे क्षेत्र अजूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे प्रमुख क्षेत्र राहिले आहे. २०२५-२६ या वर्षात आयटी क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २.३ टक्क्यांनी वाढून ५९.५ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा ५८.२ लाख इतका होता. विशेष म्हणजे, या वर्षात १.३५ लाख नवीन तरुणांना या क्षेत्रात थेट रोजगार मिळेल.

‘एआय’चा करिश्मासध्या जगभरात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची (एआय) चर्चा असताना, भारतीय कंपन्यांनीही यात मोठी झेप घेतली आहे. तंत्रज्ञान क्षेत्राच्या एकूण महसुलापैकी १० ते १२ अब्ज डॉलरचा हिस्सा हा केवळ नव्या पिढीच्या तंत्रज्ञान सोल्युशन्समधून (जनरेटिव्ह एआय) येत असल्याचे नॅसकॉमने स्पष्ट केले.

महसुली अंदाजात सुधारणानॅसकॉमने मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ चा यापूर्वीचा २८२.६ अब्ज डॉलरचा महसुली अंदाज सुधारून तो २९७ अब्ज डॉलर केला आहे. आव्हानात्मक परिस्थिती असूनही २०२४-२५ मध्ये ५.९ टक्के असलेला महसूल वृद्धीचा दर २०२५-२६ मध्ये ६.१ टक्क्यांवर पोहोचणे, हे भारतीय आयटी कंपन्यांच्या जागतिक वर्चस्वाचे प्रतीक मानले जात असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian IT sector to add 1.35 lakh jobs, revenue soaring.

Web Summary : India's IT sector anticipates robust growth, projecting $315 billion revenue, a 6.1% increase, in fiscal year 2025-26. NASSCOM forecasts 1.35 lakh new jobs, fueled by advancements in AI and technology solutions, boosting total employee count to 59.5 lakh.
टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी