विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 19, 2014 00:43 IST2014-09-19T00:43:27+5:302014-09-19T00:43:27+5:30
बुलडाणा शहरातील इमारतीवर काम करताना वीजेचा झटका लागला.

विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू
बुलडाणा : शहरातील इमारतीवर काम करताना विद्युत तारेचा जोरदार झटका लागून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास टिपु सुलतान चौकात घडली. इमारतीचे काम सुरु असताना लोखंडी पाईप तिसर्या मजल्याहून उतरवत असताना या पाईपचा नजीकच्या विद्युत तारांना स्पर्श झाला. यामुळे इंदिरा नगर येथील मो.इरफान मो.इक्बाल याला विद्युत झटका लागला. त्याला स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या दरम्यान युवकाचा मृत्यू झाला.