पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून युवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:47 AM2021-05-18T11:47:48+5:302021-05-18T11:48:07+5:30

Khamgaon Crime News : पोलिसांचा खबरी असल्याचा संशयातून दोघांनी एका युवकास लोखंडी सळईने जबर मारहाण केली.

The youth was beaten on suspicion of being a police informant | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून युवकास मारहाण

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून युवकास मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पोलिसांचा खबरी असल्याचा संशयातून दोघांनी एका युवकास लोखंडी सळईने जबर मारहाण केली. ही घटना १५ मे रोजी गोपाळनगर परिसरात घडली. याप्रकरणी युवकाने रविवारी तक्रार दिली. त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपाळ नगरातील प्रवीण प्रकाशसिंग राजपूत (३०) हा घरी झोपलेला असताना सचिन आणि रोहण गेडाम रा. रावण टेकडी यांनी पोलिसांना माहिती देण्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर लोखंडी सळईने हाता, पायावर आणि डोक्यावर सळईने मारहाण केली. 
अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. 
याप्रकरणी राजपूत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन आणि रोहण गेडाम यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पुढील तपास खामगाव पाेलीस करीत आहेत. जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: The youth was beaten on suspicion of being a police informant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.