अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार, खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारातील घटना
By अनिल गवई | Updated: April 15, 2024 15:05 IST2024-04-15T15:05:23+5:302024-04-15T15:05:40+5:30
ही घटना खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारात उशिरारात्री घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार, खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारातील घटना
खामगाव: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ३५ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारात उशिरारात्री घडली. सतीष अजाबराव तेलगोटे रा. बोरीअडगाव असे मृतकाचे नाव आहे.
तक्रारीनुसार, बोरीअडगाव येथील सतीष अजाबराव तेलगोटे हा एम एच २० डी जे ९३९६ या दुचाकीने रात्री बोरीअडगाव येथून खामगावकडे येत होता. दरम्यान, उशीरा रात्री अज्ञात वाहनचालकाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात सतीषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले. घटनेनंतर अनोळखी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे मनोहर शंकर सुखाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधा भादंवि कलम २७९, ३०४ अ, ४२७ सहकलम १३२, १३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ मनोज चव्हाण करीत आहेत.