बुलढाणा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:54 IST2018-09-24T14:53:42+5:302018-09-24T14:54:25+5:30
मलकापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना मलकापूर येथील बुलढाणा रस्त्यावर गजानन अँग्रो सेंटर समोर रविवारी रात्री ८ वाजता घडली.

बुलढाणा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
मलकापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना मलकापूर येथील बुलढाणा रस्त्यावर गजानन अँग्रो सेंटर समोर रविवारी रात्री ८ वाजता घडली.
राहुल रामचंद्र कुयटे वय २५ रा.खामखेड ता.मलकापूर हा युवक मलकापूरात सर्व्हिंसींग सेंटरवर काम करतो. रविवारी रात्री ८ वाजता तो मोटारसायकल क्र. एम एच २८ /जे २०८८ या वाहनाने नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांच्या घराकडून बुलढाणा रस्त्यावर येत होता.त्यात त्याच्या मोटारसायकलीची जबर धडक एका वाहनाशी झाली. राहूल कुयटे या युवकाच्या डोक्याला मार बसला. त्यात तो जागीच ठार झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची वार्ता कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.(तालुका प्रतिनिधी)