थ्रेेशरमध्ये हात गेल्याने युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:48 IST2017-10-24T00:47:28+5:302017-10-24T00:48:18+5:30
किनगावराजा: थ्रेशरमधून सोयाबीन काढणीचे काम सुरू अस ताना येथील एका युवकाचा हात मशीनमध्ये गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली.

थ्रेेशरमध्ये हात गेल्याने युवक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
किनगावराजा: थ्रेशरमधून सोयाबीन काढणीचे काम सुरू अस ताना येथील एका युवकाचा हात मशीनमध्ये गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली.
किनगाव राजा येथील हरिभाऊ खरात यांच्या शेतामध्ये २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सोयाबीन थ्रेशरमधून काढणीचे काम सुरू होते. दरम्यान, येथील युवक शे. सलाउद्दीन शे. अलाउद्दीन हा थ्रेशरमध्ये सोयाबीन टाकत अस ताना त्याचा उजवा हात तुटला. त्यामुळे तो जखमी झाल्याने किनगावराजा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर प्र थमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्यास जालना येथे हलविण्यात आल आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली.