त्रासाला कंटाळून महिलेने घेतला विषाचा घाेट, तिघांवर गुन्हा

By संदीप वानखेडे | Updated: October 15, 2023 17:51 IST2023-10-15T17:51:30+5:302023-10-15T17:51:49+5:30

याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी १५ ऑक्टाेबर राेजी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

woman took poison, three people were charged with the crime | त्रासाला कंटाळून महिलेने घेतला विषाचा घाेट, तिघांवर गुन्हा

त्रासाला कंटाळून महिलेने घेतला विषाचा घाेट, तिघांवर गुन्हा

डाेणगाव (बुलढाणा) : त्रासाला कंटाळून मेहकर तालुक्यातील वरुड येथील महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ ऑक्टाेबर राेजी घडली. याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी १५ ऑक्टाेबर राेजी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चंदा राजू भोसले असे मृतक महिलेचे नाव आहे़

वरुड येथील सचेश राजू भाेसले याने पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याची आई चंदा राजू भोसले हिला वडील राजू ऊर्फ ज्योती ललमा भोसले व काका साहेबराव ललमा भोसले व काकू पिंकी साहेबराव भोसले हे नेहमी मारहाण करीत होते. १४ ऑक्टाेबर राेजीही त्यांनी मारहाण केली. त्यांच्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून चंदा राजू भोसले हिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून डाेणगाव पाेलिसांनी राजू ऊर्फ ज्योती ललमा भोसले, साहेबराव ललमा भोसले व पिंकी साहेबराव भोसले सर्व रा. वरुड, ता. मेहकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

Web Title: woman took poison, three people were charged with the crime