वादळी वार्‍याचा तडाखा ; अनेक गावे अंधारात

By Admin | Updated: June 4, 2014 00:42 IST2014-06-03T23:52:54+5:302014-06-04T00:42:26+5:30

वादळाचा तडाखा;मोताळा-नांदुरा तालुक्यात अनेक विद्युत पोल कोसळले.

Windy Strike; Many villages are in the dark | वादळी वार्‍याचा तडाखा ; अनेक गावे अंधारात

वादळी वार्‍याचा तडाखा ; अनेक गावे अंधारात

मोताळा : पावसासह वादळी वार्‍याने सोमवारी सायंकाळी अचानक हजेरी लावल्याने मोताळा-नांदुरा तालुक्यातील अनेक विद्युत पोल कोसळले. यामुळे परिसरातील अनेक गावे अंधारात होती. यामुळे विद्युत वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोताळा-नांदुरा तालुका परिसरात २ जूनच्या सायंकाळी तुरळक पावसासह वादळी वार्‍याने थैमान घातले. वादळी वार्‍यामुळे मोताळा-नांदुरा तालुक्यातील अनेक गावांमधील व शेतांमधील विद्युत पोल पडले, तर अनेक ठिकाणी पोल वाकून विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. यामध्ये प्राप्त माहितीनुसार उच्च दाब वाहिनीचे ३0 विद्युत पोल, तर जवळपास ३0 ते ४0 लघूु उच्च दाब वाहिनीचे विद्युत पोल कोसळले आहे. त्यामुळे अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. काही ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपीटही झाली असल्याचे वृत्त असून, वादळाच्या थैमानात वीज वितरण कं पनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांना माहिती मिळताच सोमवारी रात्रीपासूनच कर्मचार्‍यांसह अधिकारी वर्ग कामाला लागले असून, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नुकसानीचे स्वरूप पाहता अतिरिक्त कर्मचारी व ठेकेदारांची आवश्यकता असल्याचे संबंधितांनी यावेळी सांगितले.

Web Title: Windy Strike; Many villages are in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.