शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 19:40 IST

चार दिवसात चौघाचा मृत्यू, १५ जखमी, ३१ गावे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हाभरात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने १ जून रोजी हजेरी लावली. पावसाची ही परिस्थिती आजही कायम आहे, जिल्ह्यातील विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा आणि पावसामुळे मोठे नुकसान केले. यात केवळ चार दिवसात ३१ गावे प्रभावित झाली. दरम्यान चौघांवर मृत्यू ओढावला, १५ नागरिक जखमी झाले. शिवाय घर, शाळांची पडझड झाली. विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडली.जिल्ह्यात १ जून पासून वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. १ जून ते ७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यत जिल्ह्यात ४४.२ मि.मी पावसाची नोंद घेण्यात आली. याची सरासरी ६.२० टक्के नोंदविण्यात आली. गत वर्षी ७ जूनपर्यत केवळ ८.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे यंदा पडलेला पाऊस निश्चित जास्त तिव्रतेचा आहे. पावसादरम्यान पडलेल्या विजा आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील सरंबा, भालेगाव, मंगरुळ नवघरे, शेलगाव आटोळ, देऊळगाव धनगर,गिरोला, धोडप, पेडका, वळती, देऊळगाव वापसा, किनगावराजा, हिवरखेड, मोताळा,रोहीणखेड, धामणगाव बढे, ब्राम्हंदा, रोहिणखेड, पोफळी, सारोळा मारोतीसह, पिंप्रीगवळी,  वरदडत्त, इसोली, देऊळघाट, हतेडी, पाडळी, धाड, अमडापूर, हिवराआश्रम ही ३१ गावे प्रभावित झाली. यामध्ये शाळा व घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू, विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

विजपडून चौघांचा मृत्यू, १५ जखमीविज पडून २ जून रोजी भालेगाव येथील रुक्मिणा धोंडगे मृत्यू झाला, तर यात तीन जखमी झाले. ३ जून रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव वापसा येथील विजय गरकळ व संतोष गरकळ व सुरेश काळे यांचा मृत्यू झाला. शेलगाव आटोळ येथे अरुण काशिनाथ बोर्डे, देऊळगाव धनगर येथे समाधान रंगनाथ खंडारे  व कचरू बावसकर विज पडून जखमी झाले. रोहिणखेड येथील महिला वादळी वाऱ्यामुळे तसच वरदडा येथील घरावरील टिनपत्रे पडून गोदावरी आनंदा गवई ही महिला गंभीर झाली. तर ५ जून रोजी देऊळघाट येथे वादळामुळे उडालेली टिनपत्रे लागल्याने ७ जण जखमी झाले.चार दिवसातील नुकसानीचा आलेखमृतक - ०४जखमी - १५जनावरांचा मृत्यू - ०८प्रभाविती घरे - २००पुर्णत: पडलेली घरे - २०पाच शाळांचे नुकसान१५ गावांमध्ये विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडली.