शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला विहिरीत ढकलले!

By admin | Updated: April 24, 2017 00:04 IST

साखरखेर्डा : राताळी शिवारात एका ३९ वर्षीय महिलेला विहिरीत ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल; महिला गंभीर जखमी साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशनांतर्गत राताळी शिवारात एका ३९ वर्षीय महिलेला विहिरीत ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील शेलूद येथील रंजना बबन भंडारे (वय ३९ वर्ष) आणि पती बबन रामजी भंडारे हे दोघे पती-पत्नी रानअंत्री येथे मोलमजुरी करून राहत होते. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास कामानिमित्त दोघे घराबाहेर पडले; परंतु बबनच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते. शेषराव काळे यांच्या विहिरीवर रंजना ही पाणी आणण्यासाठी गेली असता तिला विहिरीत ढकलून वरतून दगडाचा मारा केला. यात रंजना ही गंभीर जखमी झाली. त्यातही तिने आरडा ओरड केल्याने इतर शेतकरी विहिरीकडे धावले आणि गंभीर जखमी रंजना हिला तातडीने बुलडाणा येथे हलविले. घटनास्थळावर पोहेका अरविंद चव्हाण यांनी जाऊन स्वत: साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून कलम ३०७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी रंजना भंडारे ही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.