खामगाव : आरामशीनचा वार्षिक हप्ता व लाकूड वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवाना पाससाठी ४७,९00 रुपयांची लाच घेताना वनपाल विजय देविदास मांडेकर यास आज अँन्टी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले. या प्रकरणी उशिरारात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. तलाव रोडवरील केशवलाल सोमजी पटेल यांनी आरामशीनचा वार्षिक हप्ता आणि लाकूड वाहतूक करण्यासाठी परवाना पाससाठी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय खामगाव येथील वनपाल विजय देविदास मांडेकर (५२) रा. सिव्हिल लाईन खामगाव याने ४७,९00 रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत पटेल यांनी अँन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सापळा रचण्यात आला. यामध्ये आज वनपाल मांडेकर रंगेहात जाळ्यात सापडला.
४८ हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात
By admin | Updated: June 1, 2014 23:45 IST