शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

बुलडाणा : विहिरी, तलाव ‘ओव्हर फ्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 3:05 PM

शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात 

बुलडाणा: तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जलपातळीत चांगलीच वाढल झाली आहे. या पावसामुळे विहिरी, तलाव ओव्हर फ्लो झाले  आहेत. शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात २२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोठे ना कोठे दररोज दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव, लघुसिंचन प्रकल्प, धाड, मासरूळ, देऊळघाट या परिसरातील लहान-मोठे तलाव  ओसांडून वाहत आहेत. येळगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्?यातील भूजलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गतवषीं पावसाळा जरी जून महिन्यात सरू झाला तरी  आॅक्टोबरमध्ये पावसाने धरणे,  तत्नाव तुडुंब भरले होते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच तालुक्?यातील बहुसंख्य नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरींची पाणीपातळी बरीच वर आली  आहे. तीन-चार वर्षांपूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेल्या होत्या. शेतकºयांनी विहिरींना  पाणी व सिंचनाकरिता लाखो रुपयांचा खर्च केला होता. काही फळबाग उत्पादक शेतकºयांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करून टँकरद्वारे पाणी मागवून फळबागा  वाचविण्याच्या प्रयत्न केला होता. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. सोबतच परिसरातील अनेक गावांनाही याच धरणावरून पाणी दिल्या  जाते. परंतू दरवर्षी तालुक्यातील भादोला, सुंदरखेड, देऊळघाट आदी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. सध्याही काही गावांमध्ये  तर आठवडा किंव पंधरा दिवसांनी ग्रापपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता पाऊस चांगला झाल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दूर झाल्याचे  दिलासादायक चित्र बुलडाणा तालुक्यात दिसून येत आहे. गत महिन्यातच येळगाव धरण झाले होते ओव्हर फ्लोयंदा रोहिणी नक्षत्रापासूतच बुलडाणा तालुक्?यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या यर्षी तरी नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही, असे चित्र  आहे. तालुक्यातून उगम असलेली महत्त्वाची पैनगंगा नदी मागील महिन्यापासून चांगली वाहत आहे. शिवाय येळगाव धरणही लवकरच ओव्हर फ्लो झाले. आगामी पीक नियोजनासाठी फायदा बुलडाणा तालक्यातील बहुतांश शेती ही सिंचनावर  अवलंबून आहे. या परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. हल्ली दररोज पाऊस  कोसळत असल्याने सोयाबीन पीक वगळता इतर पिकांची परिस्थिती चांगली आहे. समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने व विहिरींना मुबलक पाणी असल्याने आगामी  हंगामातील पीक नियोजन चांगले करता येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण