शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला, पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:21 IST

Buldhana News : पेरणी याेग्य क्षेत्रापैकी २८.१८ टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याचे कृषी विभागाची नोंद स्पष्ट करते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात प्रारंभी पावसाने काहीशी संसतधार हजेरी लावली असली तरी मधल्या काळात पुन्हा दडी मारल्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहे. वर्तमान स्थितीत एकूण पेरणी याेग्य क्षेत्रापैकी २८.१८ टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याचे कृषी विभागाची नोंद स्पष्ट करते. त्यामुळे जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११.०४ टक्केच पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १६.४७ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे अद्यापही पाच टक्के पाऊस कमी आहे. पडलेला पाऊस हा विखूरलेल्या स्वरुपात पडला आहे. खामगाव, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा या चार तालुक्यांचा अपवाद वगळता अन्यत्र अपेक्षीत अशी पेरणी पावसा अभावी शेतकऱ्यांनी केली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरवर पेरणीचे उदिष्ट असून त्यापैकी २ लाख ६ हजार ८८६.१० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. खतांचासाही साठा उपलब्ध आहे. अपेक्षीत पाऊस पडला नसला तरी शेतकरी पीकांचे जीवनचक्र पाहता पेरणीला प्राधान्य देत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. यावर्षी मृग नक्षत्रात अपेक्षीत पाऊस पडला नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाweatherहवामानagricultureशेतीFarmerशेतकरी