शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

पाणी आरक्षणात कपातीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:12 IST

बुलडाणा : परतीच्या पावसामुळे वार्षिक सरासरी जिल्ह्याने गाठली असली तरी ९१ प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अवघा ३५ टक्के जलसाठा आहे. परिणामी यावर्षी कृषी व बिगर सिंचन पाणी आरक्षणात प्रसंगी मोठ्या प्रमाणावर कपातीचे संकेत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये ३५ टक्केच जलसाठा आरक्षण समितीच्या बैठकीची प्रतीक्षा

बुलडाणा : परतीच्या पावसामुळे वार्षिक सरासरी जिल्ह्याने गाठली असली तरी ९१ प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अवघा ३५ टक्के जलसाठा आहे. परिणामी यावर्षी कृषी व बिगर सिंचन पाणी आरक्षणात प्रसंगी मोठ्या प्रमाणावर कपातीचे संकेत आहे. त्यातच खामगाव औद्योगिक वसाहत आणि शेगाव संस्थाने यावर्षी जादा पाण्याची मागणी केली आहे.त्यातच १५ आॅक्टोबरला प्रकल्पांमध्ये असलेल्या जलसाठ्याच्या आधारावर आगामी काळासाठी पिण्याचे तथा कृषी क्षेत्रासाठीचे पाणी आरक्षीत केले जात असले तरी अद्याप पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचा मुहूर्त निघालेला नाही. ३१ आॅक्टोबर अखेर ही बैठक घेणे क्रमप्राप्त आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तथा जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते. याबाबत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर बैठक घेण्याबाबत सुचना प्राप्त न झाल्यामुळे ती कधी होणार याकडे लक्ष लागून आहे.वर्तमानस्थितीमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये १८६.२४ दलघमी जलसाठा असून सरासरी तो अवघा ३४.९१ टक्के आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात ११ पालिका आणि दोन नगरपंचायतींमधील सुमारे साडेपाच लाख नागरिकांसाठी १०.५७ दलघमी तर ग्रामीण भागातील जवळपास दीडशे गावांसाठी २१ दलघमी पाण्याची अवश्यकता आहे. याव्यतिरिक्त खामगाव आणि चिखली येथील औद्योगिक वसाहतीसाठी ०.६४ दलघमी पाणी आरक्षीत करण्याची गरज आहे. गतवर्षी शहरी, ग्रामीण आणि नागरी तथा औद्योगिक वसाहतीसाठी ३४.०८ दलघमी पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला होता. मात्र यावर्षी प्रकल्पातील जलसाठा अवघा ३४ टक्के आहे. त्यामुळे कृषी तथा औद्योगिक वसाहतीसाठीच्या पाणी आरक्षणात प्रसंगी कपात होण्याचे संकेत. आहे. परंतु प्रत्यक्षात ही बैठक कधी होते यावर पुढचे गणीत अवलंबून आहे.--प्रकल्पातील जलसाठा--मोठे प्रकल्प           पाणीसाठा        टक्केवारीनळगंगा                 २८.७३        ४१.४५पेनटाकळी               २६.१८        ४३.६६खडकपूर्णा                 १८.२९         १९.५८मध्यम प्रकल्प (७)    ५७.०४         ४१.९१लघूप्रकल्प (८१)          ५६         ३२.०४एकुण प्रकल्प (९१)     १८६.२४         ३४.९१(पाणीसाठा हा दलघमीमध्ये आहे.)

--गतवर्षी होता ७३ टक्के जलसाठा--जिल्ह्यात गतवर्षी ९१ प्रकल्पामध्ये ३९१.२३ दलघमी अर्थात ७३.३३ टक्के जलसाठा १५ आॅक्टोबरच्या तारखेत उपलब्ध होता. त्या तुलनेत पाणी आरक्षणासाठी गृहीत धरण्यात येणार्या १५ आॅक्टोबरच्या तारखेत हा जलसाठा ३४.९१ टक्केच आहे. त्यामुळे यावर्षी पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत कृषी व औद्योगिक क्षेत्राताच्या पाणी आरक्षणात कपात होण्याचे संकेत आहेत.

--ग्रामंपंचायतींचे दुर्लक्ष--परतीच्या पावासाने जिल्ह्याला सरासरी गाठून दिली असली तरी नेमक्या ज्या प्रकल्पावर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. त्याच प्रकल्पांमध्ये अल्पसाठा आहे. एकड्या खडकपूर्णा प्रकल्पावर ४४ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायती पाणी आरक्षणाच्या मागणीबाबत उदासीन आहे. त्यामुळे सिंचन शाखेला आगामी काळासाठी पाणी आरक्षणाची आकडेमोड करताना अडचणी येत आहे. त्यामुळे ग्रामंपचायतींनीही त्यांची मागणी सिंचन विभागाकडे त्वरेने नोंदविण्याची गरज आहे.

--शेगाव संस्थांनाला हवे जादा पाणी--दरवर्षी साधारणपणे शेगाव संस्थानला वर्षाकाठी दोन दलघमी पाण्याची गरज पडते. मात्र संस्थांचा वाढता व्याप पाहता यावर्षी शेगाव संस्थाने अतिरिक्त चार दलघमी पाण्याची मागणी केली आहे. मन प्रकल्पावरून चार दलघमी पाणी संस्थाना यावर्षी हवे आहे.

--गतवर्षीेचे पाणी आरक्षण--शहरी:- १०.५७ दलघमी (११ पालिका)ग्रामीण :- २०.८७ दलघमी (१५० गावे)एमआयडीसी :- ०.६४ दलघमी (खामगाव, चिखली)

टॅग्स :Waterपाणी