शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पावसाळ्यात पाणीटंचाई! ७७ गावात ८० टँकर, अवघा ५ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 19:02 IST

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे.

बुलडाणा - पावसाळ्याचा दीड महिना उलटत आला असला तरी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे. येत्या काळात दमदार पाऊस पडून प्रकल्प न भरल्यास ऑगस्ट नंतर शहरी भागातील साडेपाच लाख आणि ग्रामीण भागातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.

जिल्ह्यातील ७७ गावांची तहान सध्या ८० टँकरद्वारे भागवावी लागत आहे. जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झाला नसल्याने पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेलेल्या मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ९१ प्रकल्पांचा संकल्पीत साठा हा ५३३.५६ दलघमी आहे. परंतु, यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात केवळ २८.१९ दलघमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा), पेनटाकळी (मेहकर) व खडकपूर्णा (देऊळगाव राजा) या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८.४९ दलघमी म्हणजे ३.८१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये पलढग (मोताळा), ज्ञानगंगा, मस (खामगाव), कोराडी (मेहकर), मन, तोरणा (खामगाव), उतावळी (मेहकर) यांचा समावेश आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये १४.१० दलघमी म्हणजे १०.३६ टक्के जलसाठा आहे. तर एकूण लघु प्रकल्प ८१ असून यामध्ये ५.६० दलघमी म्हणजे ३.२० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे या ७७ गावांमध्ये ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावालगतच्या विहिरीत पाइपद्वारे टँकरमधील पाणी सोडण्यात येते. त्यानंतर गावातील महिला व ग्रामस्थांना त्या विहिरीतून पाणी काढून पाणी भरावे लागते. सध्या शेतातील कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या वेळेतही अनेक वेळेस गावातील नागरिकांना टँकरची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे आहे.

* साडेचारशे गावे विहीर अधिग्रहणावरजिल्ह्यात जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. जिल्ह्यात ८० टँकर तर सुरू आहेतच. याशिवाय पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहणही करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ४४२ गावांमध्ये ५२१ विहीर अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

* गतवर्षीपेक्षा परिस्थिती गंभीरगतवर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई दिसून आली नाही. गतवर्षी पेक्षा यावर्षीच्या  पाणीटंचाईची परिस्थिती जरा गंभीर आहे. २०१७ मध्ये या दिवसात केवळ २९ गावात ३० टँकर सुरू होते आणि ४०३ गावांमध्ये ४९२ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा ८० टँकर व ५२१ विहीर अधिग्रहण आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणीbuldhanaबुलडाणा