शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी; विभागाचा निकाल ९३.२२ टक्के 

By ब्रह्मानंद जाधव | Updated: June 2, 2023 14:32 IST

अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के निकाल

बुलढाणा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला. अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के निकाल लागला असून, यामध्ये पश्चिम वऱ्हाडात वाशिम जिल्ह्यानेच बाजी मारली आहे. तर बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी राहिला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. बारावीच्या निकालानंतर आता दहावीचा निकाल केव्हा लागेल याची उत्सूकता मुलांना होती. पश्चिम वऱ्हाडात बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अव्वल राहिला, त्यानंतर दहावीच्या निकालातही वाशिम जिल्ह्याने आपले स्थान अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर ठेवले आहे. अमरावती विभागाचा इयत्ता दहावीचा निकाल ९३.२२ टक्के निकाल लागला असून, यामध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या वाशिम जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के लागला आहे. पश्चिम वऱ्हाडातून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.९० टक्के, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा निकाल ९३.६२ टक्के लागला आहे.

असा आहे वऱ्हाडातील निकालजिल्हा मुले मुली एकूणअकोला ९१.२२ ९६.२७ ९३.६२बुलढाणा ९२.४९ ९५.६१ ९३.९०वाशिम ९४.०३ ९६.६४ ९५.१९

वऱ्हाडातून ७७ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्णपश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातून एकूण ८२ हजार ६६२८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. यामध्ये ७७ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील २४ हजार ७१९ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांची संख्या ११ हजार ८१३ व मुली ११ हजार ३३१ आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ३८ हजार ९८३ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुले १९ हजार ७५१ आणि मुली १६ हजार ८५६ आहेत. वाशिम जिल्ह्यात १८ हजार ९६६ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुले ९ हजार ९१० आणि ८ हजार १४४ आहेत.

रिपीटर विद्यार्थ्यांचा ५५ टक्के निकालपश्चिम वऱ्हाडातील दहावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ५५ टक्क्यांवर लागला आहे. बुलढाणा जिल्ह्याचा ५१.९५ टक्के, अकोला जिल्हा ५७.४७ टक्के आणि वाशिम जिल्ह्याचा ६६.०७ टक्के निकाल रिपीटर विद्यार्थ्यांचा लागला आहे.

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीSchoolशाळा