अवैध धंदे बंद करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:12+5:302021-07-07T04:43:12+5:30
शीलाताई ठाकूर यांची निवड बुलडाणा: केंद्रीय मानवाधिकार संघटेनच्या बुलडाणा जिल्हा महिला केंद्रीय प्रतिनिधी म्हणून शीलाताई रामसिंह ठाकूर यांची निवड ...

अवैध धंदे बंद करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा
शीलाताई ठाकूर यांची निवड
बुलडाणा: केंद्रीय मानवाधिकार संघटेनच्या बुलडाणा जिल्हा महिला केंद्रीय प्रतिनिधी म्हणून शीलाताई रामसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. त्या साईकृपा महिला मंडळ सुंदरखेड या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे चेअरमनकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
रस्त्यावर चिखल साचल्याने नागरिक त्रस्त
बुलडाणा : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता खोदण्यात आलेला आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
पारधी पाड्यांवर सुविधांचा अभाव
मोताळा : पारधी पाड्यांवर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्षच होत आहे. पारधी समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आदी सुविधांची दर्जेदार कामे करणे अपेक्षित आहे. पं.दीनदयाल अंत्योदय योजनेतून सर्व पारधी बांधवांना धान्यपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.