रेमडेसिविरसाठी वेटिंग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:48+5:302021-04-18T04:34:48+5:30

शिवभोजन थाळीत दीडपट वाढ बुलडाणा : राज्यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर झाले आहे. या काळात गोरगरीब, मजुरांचे हाल ...

Waiting for Remedivir remains | रेमडेसिविरसाठी वेटिंग कायम

रेमडेसिविरसाठी वेटिंग कायम

Next

शिवभोजन थाळीत दीडपट वाढ

बुलडाणा : राज्यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर झाले आहे. या काळात गोरगरीब, मजुरांचे

हाल होणार नाहीत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी दुपारच्या आतच सर्व थाळ्या संपल्या होत्या. त्यामुळे आता थाळ्यांची संख्याही दीडपटीने वाढली आहे.

सामाजिक उपक्रमांवर भर

बुलडाणा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यंदा सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बुलडाणा शहरासह तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये रक्तदान शिबिर, मास्क, सॅनिटायझरचे वाटप आदी उपक्रम राबिवण्यात आले.

विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर ‘वॉच’

मेहकर : संचारबंदी असताना नाहक रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांचा वॉच आहे. वाहनचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शहर पोलिसांनी दोन दिवसांत अनेक वाहनधारकांवर कारवाई केली.

संचारबंदीने केली व्यावसायिकांची पंचाईत

देऊळगाव मही : संचारबंदीमुळे व्यवसाय बंद असल्याने लघु व्यावसायिक व टपरीधारकांची पंचाईत झाली आहे. हातावर पोट असल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्यवसाय बंद, तर घरात पैसे येणे बंद झाले आहे.

कोरोना वाढला, फवारणीची गरज !

हिवरा आश्रम : येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता येथे ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक औषधफवारणी करण्याची गरज आहे. सरपंच, सचिवांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Waiting for Remedivir remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.