अज्ञात वाहनाच्या धडकेत वाचमनचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: September 16, 2023 19:39 IST2023-09-16T19:38:47+5:302023-09-16T19:39:51+5:30
पिंप्री खंदारे येथील भिकाजी काकडे हे पिंप्री खंदारे येथील एका हाॅटेलवर वाॅचमन म्हणून काम करत होते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वाचमनचा मृत्यू
बिबी : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हाॅटेलवर वाॅचमन म्हणून काम करीत असलेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर राेजी मेहकर ते सिंदखेड राजा रस्त्यावर घडली. भिकाजी गंगाराम काकडे (वय ७५) रा. पिंप्री खंदारे असे मृतकाचे नाव आहे.
पिंप्री खंदारे येथील भिकाजी काकडे हे पिंप्री खंदारे येथील एका हाॅटेलवर वाॅचमन म्हणून काम करत होते. ते आपली ड्युटी करून घराकडे जात असताना मेहकर ते सिंदखेड राजा रस्त्यावर चाैधर यांच्या शेताजवळ भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. यामध्ये त्यांच्या डाेक्याल आणि उजव्या हाताला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. या प्रकरणी संताेष भिकाजी काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिबी पाेलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिबी पाेलीस करीत आहेत.