vidhan sabha 2019 : ९ लाख ६८ हजार मतदारांवर राजकीय पक्षांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:58 PM2019-10-01T16:58:47+5:302019-10-01T16:59:59+5:30

जिल्ह्यातील २० लाख ३९ हजार ४३५ मतदारांच्या संख्या पाहता तब्बल ४७.४८ टक्के मतदार हे १८ ते ३९ वयोगटातील आहेत.

vidhan sabha 2019: political party's eyes on 9 lakh 68 thousand voters |  vidhan sabha 2019 : ९ लाख ६८ हजार मतदारांवर राजकीय पक्षांचा डोळा

 vidhan sabha 2019 : ९ लाख ६८ हजार मतदारांवर राजकीय पक्षांचा डोळा

Next

बुलडाणा: विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोराने वाहन्यास प्रारंभ झाला असून बहुतांश विधानसभा मतदारसंघातील तगड्या पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात १८ ते ३९ वयोगटातील तब्बल ९ लाख ६८ हजार मतदार असून त्यांचा कौल कोणाच्या पथ्यावर पडणार हा कळीचा मुद्दा सध्या जिल्ह्यात चर्चिल्या जात आहे. जिल्ह्यातील २० लाख ३९ हजार ४३५ मतदारांच्या संख्या पाहता तब्बल ४७.४८ टक्के मतदार हे १८ ते ३९ वयोगटातील आहेत. त्यामुळे या मतदारांचा कौल हा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या जाहीरनाम्यात नेमके काय आहे हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत येणार आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीनंतर बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये १३ हजार ५१८ मतदार वाढलेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख ३९ हजार ३१५ मतदारांची संख्या वाढली होती. यात महिलांची संख्या ७० हजार २६५ तर पुरुषांची संख्या ही ६९ हजार ५० च्या आसपास होती. त्या तुलनेत यंदा एक लाख ६० हजार २९९ मतदार हे २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेले आहेत. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा विचार करता गेल्या पाच वर्षात ७.८८ टक्क्यांनी हे मतदार वाढले आहेत. २०१४ मध्ये जिल्ह्यात १८ लाख ७९ हजार १३६ मतदार होते. त्यामुळे वाढलेले हे ७.८८ टक्के मतदारही प्रसंगी अतितटीच्या लढतीत निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे राजकीय पक्ष या मतदारांनाही आपल्याकडे आकर्षीत करण्याचे नेमके काय प्रयत्न करतात या बाबतही सध्या उत्सूकता आहे. मात्र खºया अर्थाने विचार केल्यास यंदा एकूण मतदारांच्या तुलनेत ९ लाख ६८ हजार ४२० मतदार हे तरूण वर्गामध्ये मोडणारे आहे. त्यांच्या मनावर नेमके गारूड कोणाचे असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही मते निर्मायक ठरू शकतात.

Web Title: vidhan sabha 2019: political party's eyes on 9 lakh 68 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.