पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:10+5:302021-07-07T04:43:10+5:30
धामणगाव धाडः दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याने वाहनधारक संकटात सापडले आहेत़ पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने जीवनावश्यक ...

पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक संकटात
धामणगाव धाडः दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याने वाहनधारक संकटात सापडले आहेत़ पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भावही वाढले आहेत़ त्यामुळे, काेराेनामुळे आधीच संकटात सापडलेले सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत़
जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०६ रु. लिटर आहे़ त्यामुळे महागाईत प्रचंड प्रमाणावर वाढ होत आहे़ सर्वसामान्य जनतेची यातून सुटका होणार का, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे़ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले हाेते़ त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशातच पेट्रोल, डिझेल वाढीमुळे महागाईने कळस गाठला आहे़ पेट्रोलचे दर १०६ रुपयांवर गेल्याने दिवसभर काम करून ३०० कमावणाऱ्या सर्वसामान्यांना वाहन चालवणे न परवडणारे ठरत आहे़ पेट्रोल व डिझेल दरवाढीने मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे़ याचबरोबर स्वयंपाक गॅसच्या किमतीतही २५ रुपयांनी वाढ झाली आहे़ वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लाेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़