दारू बंदी जनजागृतीसाठी पारंपारिक दवंडीचा वापर

By Admin | Updated: April 30, 2017 14:12 IST2017-04-30T14:12:39+5:302017-04-30T14:12:39+5:30

डोणगावातील संपूर्ण तरुणहे दारूबंदी व्हावी म्हणून जनजागृती रॅली संपूर्ण गावातून काढणार आहेत.

Use of traditional bidis for alcohol ban public | दारू बंदी जनजागृतीसाठी पारंपारिक दवंडीचा वापर

दारू बंदी जनजागृतीसाठी पारंपारिक दवंडीचा वापर

डोणगाव : शासनाने संपूर्ण राज्यात राज्य महामार्गालगतची दारू दुकाने
हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर झपाट्याने दारूची दुकाने बंद झाली परंतु
अवैध दारूचा महापूर वाढला. यावर दारू विक्रेत्यांनी विविध युक्त्या लढवित
गावात दारूची दुकाने सुरू व्हावी म्हणून प्रयत्न चालविला असतानाच
डोणगावातील तरुणांनीही गावात दारूच्या दुकानांना परवानगी मिळू नये व
गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र दिनी १ मे ला
ग्रामसभेत संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.
युवकांनी एकत्र येऊन २५ एप्रिलपासून संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी
म्हणून स्वाक्षरी मोहीम राबविली असून आतापर्यंत हजारो गावकऱ्यांनी
दारूबंदीच्या विरोधात स्वाक्षऱ्या दिल्या असून सदर युवकांनी दारूबंदी
विभाग, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन यांना अर्ज करुन गावात दारूबंदी
करण्याची मागणी केली आहे. तरुणाई एवढ्यावरच न थांबता दारूबंदीच्या
ठरावाला गावकऱ्यांनी १ मे ला उपस्थित राहून गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी
यासाठी चक्क पारंपारिक दवंडीचा वापरही गावातील तरुणांनी गावकऱ्यांसाठी
करुन १ मे ला दारूबंदी ठराव घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन २८
एप्रिलला संपूर्ण गावात केले आहे व ३० एप्रिलला डोणगावातील संपूर्ण तरुण
हे दारूबंदी व्हावी म्हणून जनजागृती रॅली संपूर्ण गावातून काढणार आहेत.
एवढे असतानासुद्धा गावातील ग्रामपंचायत ठराव घेण्यास सज्ज झाल्याचे
चित्रही दिसून येत आहे तर गावात स्वखर्चाने तरुणांनी दिलेली जनजागृतीची
दवंडी लक्ष वेधून घेत आहे.
(वार्ताहर)

Web Title: Use of traditional bidis for alcohol ban public