विनापरवाना रेतीची वाहतूक; चार ट्रॅक्टर पकडले!
By Admin | Updated: July 12, 2017 00:58 IST2017-07-12T00:58:10+5:302017-07-12T00:58:10+5:30
संग्रामपूर : तालुक्यात विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वरवट बकाल येथील दोन वाहनांचा तर पातुर्डा फाट्यावरील दोन वाहनांचा समावेश आहे.

विनापरवाना रेतीची वाहतूक; चार ट्रॅक्टर पकडले!
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यात विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वरवट बकाल येथील दोन वाहनांचा तर पातुर्डा फाट्यावरील दोन वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई दुपारी २ वाजतापासून ते ४ वाजेपर्यंत करण्यात आली. वरवट बकाल फाट्यावरून ट्रॅक्टर चालक कैलास हरिश्चंद्र तायडे रा. तेल्हारा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० जे ९९१५ व ट्रॅक्टर चालक संतोष सुखदेव पहुरकर रा. भीमनगर तेल्हारा ट्रॅक्टर क्र.एमएच २७ बीबी ३५०८ हे दोघे ट्रॅक्टर चालक विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांना दिसून आले. तर पातुर्डा फाटा येथे ट्रॅक्टर चालक अमोल जनार्दन दांडगे रा. घोडेगाव ट्रॅक्टर क्र.एमएच ३० एबी-९०९६ तर ट्रॅक्टर चालक प्रमोद सहदेव गवई ट्रॅक्टर क्र. एमएच ३० एबी ९२५० हे विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना उपविभागीय अधिकारी गोगटे यांना दिसून आल्यामुळे चारही ट्रॅक्टर संग्रामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.