आदिवासी विभागात आता ‘अनलॉक लर्निंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:48 AM2020-10-11T11:48:52+5:302020-10-11T11:55:56+5:30

Unlock Learning, Education Sector विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचवले जाणार आहे.

'Unlock Learning' in Tribal Areas | आदिवासी विभागात आता ‘अनलॉक लर्निंग’

आदिवासी विभागात आता ‘अनलॉक लर्निंग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळा कोरोनामुळे अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या काळात विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचवले जाणार आहे. त्यासाठी २८ कोटी रूपयांतून शैक्षणिक किटचा पुरवठा करण्याचा आदेश ९ आॅक्टोबर रोजी देण्यात आला.
आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणणे अद्यापही शक्य नाही. त्यामुळे निवासी आश्रमशाळांतील पहिल्या सत्राचे अनौपचारिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ११ उपसचिवांच्या समितीने नियोजन आराखडा तयार केला. त्यामध्ये शैक्षणिक प्रयोग केलेले अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व अभ्यासकांचाही समावेश होता.
त्यासोबतच आता आदिवासी विकास विभागाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण घरपोच देण्याची तयारी झाली. आयुक्तालयाने ‘अनलॉक लर्निंग’ हा पयार्यी शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कार्यपुस्तिका मिळणार आहेत. सोबतच शैक्षणिक किटही दिली जाईल. त्यासाठी २८ कोटी ५९ लाख ५६ हजार रुपये निधी खचार्लाही शासनाने मंजूरी दिली.
कार्यपुस्तिका तसेच शैक्षणिक किटचा पुरवठा तातडीने करण्यासाठीचे निर्देशही आदिवासी विकास आयुक्तांना देण्यात आले. तसेच राज्यातील सर्व प्रकल्पामध्ये खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये समानता ठेवण्यासाठी शैक्षणिक किटमधील वस्तू, त्यांचे परिमाण, स्पेशिफिकेशन, दर्जा आयुक्तांकडून निश्चित केला जाईल.

Web Title: 'Unlock Learning' in Tribal Areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.