सिंदखेडराजा : येथील मोती तलावामध्ये एका २३ वर्षीय अज्ञात युवकाचा आज १ जून रोजी मृतदेह आढळून आला आहे. सिंदखेडराजा ते जालना महामार्गावर असलेल्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर आहे. या विहिरीजवळ मोती तलावामध्ये एका २३ वर्षीय अज्ञात युवकाचे प्रेत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याची उंची १७१ से.मी. असून डो क्यावर मध्यम काळे केस आहेत. अंगावर काळ्या रंगाचे जाकीट, काळसर पँट व शर्ट असा पोशाख असून, गळा आवळून त्याचे प्रेत पाण्यात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाची ओळख पटली नसून, त्याचे प्रेत ग्रामीण रुग्णालयाच्या शवगारा त ठेवण्यात आले आहे.
अज्ञात युवकाचे प्रेत आढळले
By admin | Updated: June 1, 2014 23:45 IST