मलकापुरात अनोखे रक्षाबंधन... जिल्हा परिषद उपाध्यक्ष मंगला रायपुरेंनी बांधली पोलिस दादाला राखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 15:50 IST2018-08-26T15:48:41+5:302018-08-26T15:50:14+5:30

Unique Rakshabandhan in Malkapur ... Zilla Parishad vice president tie rakhi | मलकापुरात अनोखे रक्षाबंधन... जिल्हा परिषद उपाध्यक्ष मंगला रायपुरेंनी बांधली पोलिस दादाला राखी 

मलकापुरात अनोखे रक्षाबंधन... जिल्हा परिषद उपाध्यक्ष मंगला रायपुरेंनी बांधली पोलिस दादाला राखी 

मलकापूर : रक्षाबंधन एक अनोखा उत्सव त्यात बहीण भावाच्या मंगलकामनेसाठी तेवतं राहते, अन भाऊ बहिणीच्या सौख्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.  मलकापुरात आज सकाळी ११ वाजता  जि.प.उपाध्यक्षा मंगलाताईरायपुरे यांनी कारंजा चौकातील पोलिस दादाला राखी बांधून सामाजिक बांधीलकी जोपासली.     रक्षाबंधन म्हटल्यावर साहजीकच सगळ्यांना वाटत आपण बहिणीच्या घरी गेले पाहिजे. अर्थातच बहिणींनाही वाटतं भाऊ आला पाहिजे. अशावेळी कर्तव्य बजावत असताना एखाद्या भावाला रक्षाबंधनासाठी जाता येत नाही. अशाच एका भावाची म्हणजेच ट्राफीक पोलिस म्हणून कार्यरत महेश चोपडे यांची मनातील इच्छा जि.प.उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे यांनी पूर्ण केली. 

Web Title: Unique Rakshabandhan in Malkapur ... Zilla Parishad vice president tie rakhi