मेहनत शेतक-याची अन कमाई व्यापा-याची!

By Admin | Updated: June 17, 2016 02:45 IST2016-06-17T02:45:31+5:302016-06-17T02:45:31+5:30

भाजीपाल्याचे दर वाढले, मात्र त्याचा लाभ शेतक-यांना नाहीच.

Unemployed farmer-earning profits! | मेहनत शेतक-याची अन कमाई व्यापा-याची!

मेहनत शेतक-याची अन कमाई व्यापा-याची!

नाना हिवराळे , मनोज पाटील / खामगाव,मलकापूर
बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले असताना, या भाववाढीचा शेतकर्‍यांना फायदा होत नसून, शेतकर्‍याचा भाजीपाला दुपटीने विक्री करून व्यापारीच मालामाल होत असल्याचे चित्र आहे.
खामगाव येथील आठवडी बाजारात दररोज पहाटे ४ पासून भाजीपाला हर्रासीला सुरुवात होते. जिल्ह्यासोबतच अकोला जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. आठवडी बाजारात मध्यरात्री ३ पासूनच रेलचेल सुरू होते. बाजारात भाजीपाला विक्रीस आलेला असताना वांगी ३0 ते ४0 रुपये किलो, पालक २५ ते ३0 रुपये, चवळी शेंगा ५0 ते ५५ रुपये, ढेमसे २५ ते ३0 रुपये, घोळ भाजी २0 ते २५ रुपये, भेंडी ४0 ते ४५ रुपये, गवार ३0 ते ३५ रुपये, गोबी २५ ते ३0 रुपये, कोथिंबीर ४0 रुपये, चवळी भाजी २५ ते ३0 रुपये, भोपळा २५ ते ३0 रुपये किलो याप्रमाणे हर्रासीत भाव मिळतो. भाज्यांचे दर कडाडले असताना अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. खेड्यांमधून गाडी भाड्याने आणण्याचा खर्च जास्त लागतो. अशा स्थितीत बाजारात हमाली, मोजमाप व अडत वजा करून घ्यावी लागते. खामगावात अडत दर शेकडा १0 टक्के एवढय़ा प्रचंड दराने कपात कपात करून घेत असल्याचे दिसून आले. एक हजाराचा भाजीपाला विक्री केल्यास १00 रूपये अडत कपात होत असताना शेतकर्‍यांना हा फटका मोठा वाटतो. दुष्काळाच्या स्थितीत कमी पावसात भाजीपाला पिकवताना लागणार्‍या कष्टाचे चीज होत नसल्याची त्यांची प्रतिक्रिया होती.
हाच प्रकार मलकापूर उपबाजार समितीमध्ये दिसून येत आहे. शेतकर्‍यांचे मालाचे भाव व्यापारीच ठरवितात; मात्र भाव वाढवत असल्याचा देखावा उभा करतात. बोलीतून अधिक भाव देईल, त्याला माल दिला जातो. नंतर शेतकर्‍याला त्या मालाचे पैसे संबंधित अडते वजनानुसार देतात; परंतु काही अडते सदर पैसे देताना बाजार समिती नियमानुसार शेतकर्‍यांकडून मापाई व हमाली मिळून तीन टक्के अडत कापण्याऐवजी त्यांना हिशेबाच्या कच्चा चिठ्ठय़ा देऊन समोर शेकडा तीन टक्के अडत, तर त्याच चिठ्ठीच्या पाठीमागे शेकडा दहा टक्के अडत कापून उर्वरित पैसे शेतकर्‍याला देतात. असा लुटीचा गंभीर प्रकार नियमितच घडतो. त्यानंतर चिल्लर विक्रेते, व्यापारी आठवडी बाजारात तोच माल चढय़ा दराने विक्री करतात. ही बाब सकाळी ९ वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात निदर्शनास आली. शेतकरी मोठय़ा कष्टाने शेतातून भाजीपाला उत्पादित करतो, तोच खर्‍या अर्थी लुटल्या जातो. अडत्याशी असलेल्या संबंधाला शेतकरी भोळेपणातून जपतो. म्हणून तो राहतो उपाशी अन् अडते-व्यापारी व भाजीपाला विक्रेते मात्र तुपाशी; असा विरोधाभास हा कायमस्वरूपी आहे व पुढेही राहणार, एवढे खरे!

Web Title: Unemployed farmer-earning profits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.