शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

नोटबंदीवरून काँग्रेस-भाजप रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:55 AM

भाजपच्यावतीने नोटाबंदीच्या निर्णयाच्या सर्मथनार्थ काळा पैसा विरोधी दिन पाळत विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे नोटाबंदीवरुन दोन पक्षात राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगल्याचे दिसून आले.यानिमित्त दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

ठळक मुद्देनोटबंदीच्या वर्षपूर्तीवरुन घाटाखाली रंगली राजकीय जुगलबंदी!काळा पैसा बाहेर आल्यानेच विरोधकांचा कांगावा : फुंडकर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याने काँग्रेसच्यावतीने काळा दिवस पाळत निदर्शने करण्यात आली. तर भाजपच्यावतीने नोटाबंदीच्या निर्णयाच्या सर्मथनार्थ काळा पैसा विरोधी दिन पाळत विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे नोटाबंदीवरुन दोन पक्षात राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगल्याचे दिसून आले.यानिमित्त दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.खामगाव : नोटबंदी ही काळ्या पैशावर मोठा आघात मानल्या जात असून वर्षभरात या निर्णयाचे खुप सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे विरोधकांचाच काळा पैसा मोठय़ा प्रमाणात बाहेर आला. यामुळेच त्यांचा कांगावा सुरू आहे., अशी घणाघाती टिका राज्याचे कृषीमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी केली.मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २0१६ रोजी घेतलेल्या ऐतिहासिक नोटबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त भाजपच्या वतीने काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ना.फुंडकर म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सुरूवातीच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात त्रास झाला. परंतु आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. देशाचे हित लक्षात घेता नागरिकांनीही सरकारच्या या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला लगाम बसला असून अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले आहेत. तसेच डिजीटल व्यवहारांकडे नागरिकांचा कल वाढला असून ५८ टक्के व्यवहार हे डिजीटल होत आहेत. या निर्णयामुळे बँकांचे व्याजदर कमी झाले असून याचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.अँड. आकाश फुंडकर यांनीही नोटाबंदी निर्णयाच्या सकारात्मक परिणामांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी नगराध्यक्षा अनिताताई डवरे, उपाध्यक्ष मुन्ना पुरवार, पं.स. सभापती उर्मिला गायकी, उपसभापती भगवानसिंग सोळंके, भाजप शहराध्यक्ष संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव शेखर पुरोहित, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, जि.प. समाज कल्याण सभापती डॉ.गोपाल गव्हाळे, न.प. गटनेता राजेंद्र धनोकार, जिल्हा उपाध्यक्ष बंडुभाऊ लांजुळकर, महिला आघाडी शहराध्यक्षा जान्हवी कुळकर्णी, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पवन गरड यांच्यासह सर्व जिल्हा परीषद, पंचायत समिती, सर्व नगरसेवक, सर्व आघाड्यांचे प्रमुख तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नोटबंदी हा राष्ट्रहिताचा निर्णय - संचेतीमलकापूर : नोटाबंदी हा राष्ट्रहिताचा निर्णय आहे आणि राष्ट्रहित समोर ठेवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील दिशा-निर्देशाचे तंतोतंत पालन पारदश्रीपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी धोरणातून केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी बुधवारी नोटाबंदी सर्मथनार्थ आयोजित सभेला संबोधित करताना केले.स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयापासून तहसील चौकापर्यंत आमदार संचेती यांच्या नेतृत्वात ‘नोटाबंदी सर्मथनार्थ रॅली’ काढण्यात आली.  यावेळी भाजपाचे पदाधिकारी शिवचंद्र तायडे, नगरसेवक अशांतभाई वानखडे, जिल्हा भाजपा सरचिटणीस मोहन शर्मा, दादाराव तायडे, शहर अध्यक्ष रामभाऊ झांबरे, कृउबास मु. प्रशासक साहेबराव पाटील, सुरेश संचेती, सिध्दीक सुपडू, संजय काजळे, जि.प.सदस्य केदार एकडे, सरदारसिंह राजपूत, भगवान पाटील, शिलाताई संबारे, रत्नप्रभा पाटील, प्रमिलाताई इंगळे, अमृत बोंबटकार, अनिल झोपे, मधुकर भलभले, सुधाकर वानखेडे, भागवत गावंडे, अरुण सपकाळ, शंकर वाघ, कमलाकर मोहदरकर, मोहन खराटे, भाजयुमोचे ज्ञानेश्‍वर पाटील, वजीर अहेमदखान, इकबाल खान, शंकरराव पाटील, सुभाष चव्हाण, पप्पुसिंह राजपूत, दिपक गाढे, नरेश देशपांडे, राजेश देशपांडे, चंद्रकांत वर्मा, मनोजसिंह राजपूत, डॉ.सुभाष तलरेजा, भाजयुमो शहर अध्यक्ष उत्कर्ष बक्षी, दिपक कपले, हरीभाऊ देशमुख, नंदुभाऊ पाटील यांचेसह मलकापूर मतदार संघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ आयोजित जाहीर सभेला आ. चैनसुख संचेती यांच्यासह शिवचंद्र तायडे, अशांतभाई वानखेडे, शिलाताई संबारे व मोजन शर्मा यांनी सुध्दा संबोधीत केले.

टॅग्स :Note BanनोटाबंदीBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरBJPभाजपाcongressकाँग्रेस