मेरा बु.येथील प्रवासी निवारा अनधिकृपणे पाडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:04+5:302021-07-07T04:43:04+5:30

चिखली : तालुक्यातील मेरा बु. येथील प्रवासी निवारा रात्रीच्यावेळेस जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनधिकृतपणे पाडण्यात आला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई ...

Unauthorized demolition of passenger shelter at Mera Bu. | मेरा बु.येथील प्रवासी निवारा अनधिकृपणे पाडला !

मेरा बु.येथील प्रवासी निवारा अनधिकृपणे पाडला !

चिखली : तालुक्यातील मेरा बु. येथील प्रवासी निवारा रात्रीच्यावेळेस जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनधिकृतपणे पाडण्यात आला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेरा बु. येथील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भाने मेरा बु. येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

मेरा बु. ते साखरखेर्डा मार्गावरील मेरा बु.ग्रा.पं.हद्दीत असलेला प्रवासी निवारा सुस्थितीत असताना काही राजकीय नेत्यांचे पाठबळ घेऊन ग्रामपंचायत प्रशासन व निवारा शेजारील घरमालकाने संगनमताने हा प्रवासी निवारा रात्रीच्यावेळी जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनधिकृपणे पाडला आहे. तसेच प्रवासी निवाऱ्यावरील लोखंडी अँगल, टिन आदी शासकीय साहित्याचे व इमारतीचे मोठे नुकसान केले असल्याने याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिलीप जाधव, कैलास आंधळे, पांडुरंग चेके, प्रदीप पडघान, अमोल पडघान, विशाल कुमठे, अनिल इंगळे, किशोर पडघान, ज्ञानेश्वर खेडेकर, वैभव पडघान, मोहन पडघान, रामेश्वर चेके, रमेशगीर गिरी, सचिन जाधव, ज्ञानेश्वर सोळंकी, सुनील चेके, दत्तात्रय पडघान, दीपक पडघान, ज्ञानेश्वर मापारी यांनी केली आहे.

Web Title: Unauthorized demolition of passenger shelter at Mera Bu.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.