Uddhav Thackeray Live: अब्दुल सत्तारांना लाथ घालून हाकलून दिले असते, जशी एकाला घातलेली; उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना शिवी घातल्यावरून संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 18:01 IST2022-11-26T18:00:20+5:302022-11-26T18:01:28+5:30
यावेळी ठाकरे यांनी विजबिल वसुलीवरून फडणवीसांच्या भाषणाचा ऑडिओ ऐकविला. ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस विजबिल वसुलीविरोधात सरकारविरोधात बोलत होते.

Uddhav Thackeray Live: अब्दुल सत्तारांना लाथ घालून हाकलून दिले असते, जशी एकाला घातलेली; उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना शिवी घातल्यावरून संतापले
काल-परवा देशाचे गृहमंत्री गुजरातमध्ये सांगत होते, २००२ मध्ये शेवटची दंगल झाली. आम्ही त्यांना कामयचा धडा शिकविला. हा धडा बुलढाण्याच्या जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना जन्माला घातले म्हणून शिकवू शकलात. २००२ मध्ये गुजरातची सत्ता तुमच्या हातात होती. आम्ही बाबरी पाडली तेव्हा मुंबई, महाराष्ट्राला वाचविले होते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अब्दुल सत्तार नाही अब्दुल गटार, मी मुद्दामहून म्हणतोय. त्याने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. मी मुख्यमंत्री असतो तर महिलांचा अपमान करणाऱ्याला लाथ घालून हाकलून दिले असते, जसे एकाला हाकलून दिलेले, अशी टीका ठाकरे यांनी केला.
यावेळी ठाकरे यांनी विजबिल वसुलीवरून फडणवीसांच्या भाषणाचा ऑडिओ ऐकविला. ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस विजबिल वसुलीविरोधात सरकारविरोधात बोलत होते. मध्य प्रदेश सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये देऊन बिले भरली, महाराष्ट्र सरकार सावकारी पद्धतीने विजबिल वसुली करत आहे. आता करून दाखवा, अशी टीका ठाकरे यांनी फडणवीसांवर केली.
खोटे बोलून रेटूने नेले जात आहे. तसेच राज्य चालविले जात आहे. पण आता जनता भोळीभाबडी राहिलेली नाही. मी मुख्यमंत्री असतो तर एकालाही आत्महत्या करावी लागली नसती. आत्महत्या करायची नाही. शिवरायांचे नाव घेतो, त्यांनी लढायला शिकविले होते. एका बाजुने लंडनमधून तलवार आणण्यास सांगायचे आणि दुसरीकडे कोश्यारी त्याच शिवाजी महाराजांविरोधात बोलणार. वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करून ठेवावा लागणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.