शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

उदनापूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात भरवली शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:25 IST

कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले. 

ठळक मुद्देकायमस्वरुपी शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले. उदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेला गेल्या तीन वर्षापासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थांचे नुकसान होत आहे. याबाबत गावकरी , जि.प.शाळा व्यवस्थापन समिती यांनी लोणार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे वारंवार मागणी केली. गटविकास अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला. परिणामी २० नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात पालकांनी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारातच  शाळा भरविली. याची दखल घेत मुख्याधिकारी षण्मुखराजन एस. यांनी उपरोक्त आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी यावेळी उजळणी म्हणत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला होता.सतत घटत चाललेली पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आलेली आहे. त्यात लोणार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या उदनापूर जिल्हा परिषद शाळेत गेल्या तीन वषार्पासून एकच कायमस्वरूपी शिक्षक आहे. १ ते ५ वर्ग आणि ५६ पटसंख्या असलेल्या उदनापूर जि.प.शाळेत तीन पदे कायमस्वरूपी असताना याठिकाणी कायमस्वरुपी एकच शिक्षक आहे. दोन शिक्षक नसल्याने गावकºयांच्या आंदोलनामुळे अंशकालीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती. परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा शिक्षकांची समस्या येथे निर्माण झाली. विद्यार्थांचे होणारे नुकसान पाहून गावकरी व शाळा समिती अध्यक्ष यांनी अनेकवेळा गटविकास अधिकाºयांकडे शिक्षकांची मागणी केली. पंरतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना गटविकास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अखेर गावकºयांनी शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. याची दखल घेत मुख्याधिकारी षण्मुखराजन एस. यांनी उदनापूर जि.प. शाळेला शिक्षक देण्याचे आदेश शिक्षणाधिकाºयांना दिले. सकाळपासून आलेल्या विद्यार्थांना प्रशासनाकडून साधी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थांनी नळातून गळती होत असलेल्या पाण्यावरच आपली तहान भागविली. हे लक्षात येताच शिवसेना नेते दिलीप वाघ यांनी सर्व विद्यार्थांना पाणी व जेवणाची व्यवस्था केली हे विशेष!

‘शिक्षक द्या’!जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी उजळणी म्हणत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयासमोर भरलेल्या अनोख्या शाळेकडे बघतच राहिले. यावेळी ‘आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आमच्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक द्या’ एवढीच आमची मागणी असल्याचे पालकांनी सांगितले.  लोणार पंचायत समिती अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. तसेच कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास सर्व विद्यार्थांचे शाळा सोडल्याचे दाखले एकाच दिवशी काढून खाजगी शाळेत टाकण्यात येतील.- दिलीप वाघ, शिवसेना नेते,लोणार. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदagitationआंदोलनSchoolशाळाTeacherशिक्षक