वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात
By संदीप वानखेडे | Updated: May 3, 2024 16:48 IST2024-05-03T16:46:47+5:302024-05-03T16:48:15+5:30
वाशिम जिल्ह्यात घडलेल्या अपघातात मेहकर येथील दाेन युवक जागीच ठार तर तीन जण जखमी झाले.

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात
संदीप वानखडे ,डोणगांव : वाशिम जिल्ह्यात घडलेल्या अपघातात मेहकर येथील दाेन युवक जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना २ मे राेजी रात्री मंगळरुळपीर रस्त्यावर काेळंबी फाट्याजवळ घडली. अंकित खडसे (वय २८) आणि निखिल शेळके (वय २९) अशी मृतकांची नावे आहेत.
मेहकर येथील संतोषी माता मंदिर परिसरात राहणाऱ्या धनंजय देशमुख यांचे लग्न मानोरा जिल्हा वाशिम येथे होते. या लग्नासाठी त्यांचे मित्र आपल्या खासगी चारचाकी गाडी क्र. एमएच २० ईजे ८०४४ ने मानोरा गेले हाेते. यावेळी समाेरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जबर धडक दिली. यामध्ये अंकित खडसे आणि निखिल शेळके या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच केनवड ता. रिसोड जि. वाशिम येथील शुभम विजय गोळे याच्या डोक्याला उजव्या बाजूने मार लागलेला आहे, तर मेहकर येथील प्रशांत कैलास रहाटे व डोणगांव ता. मेहकर येथील निखिल राजेश बाजड हे किरकोळ जखमी झालेले आहेत. अपघातात दाेन युवकांचा मृत्यू झाल्याने मेहकर शहरात हळहळ व्यक्त हाेत आहे.