शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू; MIDC पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

By विवेक चांदुरकर | Updated: June 13, 2024 13:16 IST

सागर मधूकर कडू (वय ३३) व नंदकिशोर समाधान धांडे (वय ३७) अशी दोघांची नावे आहेत

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर (बुलढाणा): तालुक्यातील विवरा येथील दोन तरुणांचा पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना श्री क्षेत्र धोपेश्वर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. नदीच्या काठावर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे दोघे पोहण्यासाठी पात्रात उतरले होते हे स्पष्ट झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तालुक्यातील श्री क्षेत्र धोपेश्वर येथील पुजारी पुंजाजी महाराज गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे स्नान करण्यासाठी गेले होते. त्यांना पूर्णेच्या काठावर दोन जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्या अनुषंगाने पोहेका राजेश बावणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थळ पंचनामा करीत असतांना नदीच्या घाटावर दुचाकी क्र.एम.एच.२८/बी.व्ही.३८१७ आढळून आली.

दोघांचे अंगावरील कपडे देखील काढून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे दोघे पोहण्यासाठी पात्रात उतरले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास केला असता दोघांची ओळख पटली आहे. त्यानुसार मृतकामध्ये सागर मधूकर कडू (वय ३३) व नंदकिशोर समाधान धांडे (वय ३७) दोघेही विवरा ता. मलकापूर यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही बुधवारी दुपारी ४ वाजेनंतर पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. दोघांचाही बुडून मृत्यू झाला या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका राजेश बावणे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूMIDCएमआयडीसीPoliceपोलिसriverनदीbuldhanaबुलडाणाSwimmingपोहणे