शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 12:11 PM

Irrigation News जिगाव प्रकल्पामुळे घाटाखालील तालुक्याचा कायापालट होऊन नंदनवन फुलणार असल्याचे स्वप्न या प्रकल्पाविषयी पाहिले जात आहे

- अनिल उंबरकार लोकमत न्युज नेटवर्कशेगाव  : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. जागा व प्रकल्पामध्ये अंशतः पाणी साठ्याचे नियोजन असून त्याकरिता अतिरिक्त सांडवा तयार करून १८२ दसघमी पाणीसाठा निर्माण होईल व २७ हजार  हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ येत्या दोन वर्षांत देता येईल, तर या पाणीसाठ्यामुळे नदीलगत कुठलेही नुकसान होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, ही या भागातील शेतकऱ्यांसाठी शुभवार्ता असून, अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिगाव प्रकल्पामुळे घाटाखालील तालुक्याचा कायापालट होऊन नंदनवन फुलणार असल्याचे स्वप्न या प्रकल्पाविषयी पाहिले जात आहे. आधी पुनर्वसन, मग धरण, तत्त्वाने प्रकल्पातील पुनर्वसनाचे काम  सुरू आहे. परंतु आधी पुनर्वसन नंतर घड भरण, याबाबत सर्वसामान्यांना माहिती नाही. प्रकल्पातील विविध टप्प्यांतील ३३ गावे पूर्ण, तर १५ गावे अंशतः बाधित आहेत. धरण, सांडवा, पुलाची कामे  पूर्ण होत आहे. या प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात  साकार व्हावे, हे सर्वसामान्यांसाठी   टप्प्याटप्प्याने सिंचनासाठी व्यक्तिगतरीत्या उचल करून लाभ मिळाला तर राष्ट्रीय उत्पन्नात भर पडणार आहे. या धरणाचे काम ९० टक्के, सांडव्याचे काम ७० टक्के झाले आहे. एकेकाळी धरणाला विरोध करणारेच आता भूसंपादन व पुनर्वसनासाठी चढाओढ करताना दिसत आहेत.प्रकल्पाच्या टप्पा-१ मध्ये ११ नवीन व ९ जुने गावठाण झाले आहेत; तर भूसंपादनाची १४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. टप्पा-२ मध्ये १३ नवीन व ८ जुने गावठाण आणि १८ भूसंपादन निवाडे. टप्पा-३ मध्ये १८ नवीन व १२ जने गावठाण व ११ प्रकरणात भूसंपादन. टप्पा-४ मध्ये ८ नवीन व ५ जुने गावठाण आणि ३० भूसंपादन प्रकरणात निवाडे झाले आहे; तर पाचव्या टप्प्यात ३७ भूसंपादनांच्या प्रकरणात निवाडे झाले आहेत. नवीन गावठाणे, जुन्या घरांचा मोबदला व बुडीत क्षेत्रातील खासगी जमिनीच्या प्रस्तावातील काही प्रकरणे १८९४च्या, तर काही प्रकरणे अधिनियम २०१३ नुसार (कलम ४ ते ६ जुन्या व नवीन कलम ११ ते २३ ) प्रक्रिया सुरू आहे. यात संयुक्त मोजणी, चौकशी मोबदल्याकरिता प्रगतीत आहे. विविध प्रशासकीय अडचणी, व्यक्तिगत, कौटुंबिक भांडणे, धोरणात बदल यामुळे मूळ काम बाजूला राहते. प्रकल्पाला विरोध तर पाचवीलाच पूजला आहे, तर दुसरीकडे अनेक गावांतील शेतकरी झपाट्याने वाढणाऱ्या फळबागा विकसित करीत आहेत. मोबदला देणे कायदेशीर व व्यवहार्य असले, तरी उद्देशपूर्तीकरिता कृत्रिम फळबागा वाढविण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १२ उपसा सिंचन योजनांचे मुख्य पाइप जमिनीत गाडण्यात आले आहेत. बंद नालीतील पाणीपुरवठा पुढे येत आहे. अनेक तांत्रिक, भौतिक, कारदेशीर आव्हानांना सामोरे जाऊन हा प्रकल्प  वाटचाल करीत आहे. आतापर्यंत अंदाजे चार हजार कोटींच्या वर खर्च झाला आहे.  जिगाव प्रकल्प पूर्ण लवकर पूर्ण व्हावा, यासाठी  सर्वांच्या सहकार्याची गरज असून, शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचाही पुढाकार आवश्यक आहे.    

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प