सोनाळा- टुनकी मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:34 IST2018-08-28T15:33:08+5:302018-08-28T15:34:28+5:30
संग्रामपूर : सोनाळा टूनकी मार्गावर पायविहिरीजवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर जबर अपघात झाला.

सोनाळा- टुनकी मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोघे गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : सोनाळा टूनकी मार्गावर पायविहिरीजवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर जबर अपघात झाला. ही घटना २८ रोजी दुपारी २ वा. दरम्यान घटना घडली. या अपघातात दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला येथे जिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले.
रामकृष्ण सोलकर रा.शिवपूर ता.अकोट जि.अकोला हा इसम संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी येथे रक्षाबंधन निमित्त आला होता. सोनाळ्यावरून एमएच३०-क्यु-६०७१ क्रमांकाची दुचाकी घेऊन टूनकीकडे जात असताना टूनकीवरून येणारी एमएच२८-एक्स-९८४५ क्रमांकांच्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली यात दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. टूनकीवरून दूचाकी घेऊन सुरेश राऊत रा. रोहनखिडकी ता. संग्रामपूर हा येत होता. या अपघातात सुरेश राऊत याचे पाय तुटल्याने डाव्या पायची हड्डी बाहेर आली आहे. तर रामकृष्ण सोलकर हा इसमही गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला मिळताच कर्मचारी श्याम कपले, भानुदास तायडे, गजानन तायडे व सुसर घटनास्थळी पोहचून अॅम्बुलन्सला बोलावून गंभीर जखमींना अकोला येथे जिल्हा रूग्णालयात रवाना केले. (तालुका प्रतिनिधी)