दूचाकी झाडावर आदळून  दुचाकीस्वार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:29 IST2021-07-24T11:29:18+5:302021-07-24T11:29:24+5:30

Accident Case : अपघातात दूचाकीस्वारचा मृत्यू झाल्याची घटना लाडणापुर जवळ गुरुवारी रात्री घडली. 

The two-wheeler collided with a tree, killing the rider | दूचाकी झाडावर आदळून  दुचाकीस्वार ठार 

दूचाकी झाडावर आदळून  दुचाकीस्वार ठार 

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: दुचाकी झाडाला आदळून अपघात घडला. या अपघातात दूचाकीस्वारचा मृत्यू झाल्याची घटना लाडणापुर जवळ गुरुवारी रात्री घडली. 
टूनकी येथील ३१ वर्षीय ज्ञानेश्वर भास्कर सूरळकार दूचाकीने टूनकीकडून जळगावकडे जात असताना लाडणापूर जवळ एका झाडाला दुचाकी आदळल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर सूरळकार याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी घटनेची माहिती प्राप्त होताच नागरिकांनी यूवकाला वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे शवविच्छेदन झाल्यावर टूनकी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात युवकावर अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The two-wheeler collided with a tree, killing the rider