शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

बुलडाणा जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 04:53 IST

डॉ. संजय कुटे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला

बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाण्याचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघात दुरंगी आणि तिरंगी लढती बघावयास मिळत आहेत. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेने युतीच्या गोटात चैतन्य निर्माण केले आहे. त्या तुलनेत आघाडीकडून अद्याप बड्या नेत्याची सभा झालेली नाही.

युतीमध्ये जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव आणि चिखली या जागा आल्या असून शिवसेनेला बुलडाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा या तीन जागा सुटल्या आहेत. आघाडीमध्ये काँग्रेस मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव, बुलडाणा, चिखली आणि मेहकर हे सहा मतदारसंघ लढवीत असून सिंदखेड राजा हा एकमेव मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे.जळगाव जामोदमध्ये भाजपचे कॅबीनेट मंत्री डॉ. संजय कुटे विरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर अशी लढत होतेय. मलकापूरमध्ये भाजपचे चैनसुख संचेती आणि काँग्रेसचे राजेश ऐकडे यांच्यात सरळ लढत आहे. बुलडाण्यात काँग्रेस, शिवसेना वंचित बहुजन आघाडी, अपक्षामध्ये चौरंगी लढत आहे. चिखलीत भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांच्या बीग फाईट होत असून सिंदखेड राजात शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत आहे.

मेहकरमध्ये शिवसेनेचे रायमुलकर विरुद्ध काँग्रेसचे अनंत वानखेडे यांच्यात लढत होत आहे. खामगावमध्ये भाजपचे अ‍ॅड. आकाश फुंडकर विरुद्ध ज्ञानेश्वर गणेश पाटील यांच्यात लढत असून वंचित बहुजन आघाडीचे शरद वसतकार मतविभाजन करण्यात कितपत यशस्वी ठरतात यावर खामगाव मतदारसंघातील गणित अवलंबून आहे.प्रचारातील प्रमुख मुद्देमहायुतीकडून गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांवर भर दिला जात आहे. सिंचन, आरोग्य, खारपाणपट्यतील पाण्याचा प्रश्न, रस्ते विकास हे मुद्दे घेऊन महायुती उमेदवारांसमोर जात आहे.’ आघाडीकडून शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी, बेरोजगारीचा प्रश्न, आर्थिक मंदीमुळे त्याची वाढलेली परिणामकारकता याचे वास्तव दर्शविण्याचा प्रयत्न होत आहे. यासोबतच मेहकर, लोणारसह लगतच्या तालुक्यातून होणारे मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठीही उपाययोजनांवर भर देण्याचे आश्वासन आघाडीतर्फे दिल्या जात आहे. मेहकरमधील एमआयडीसीचा मुद्दाही निवडणुकीच्या काळात चर्चेत आला आहे.’ सिंदखेड राजात २० विरुद्ध पाच वर्षात झालेल्या विकास कामांचीच चर्चा होत आहे. आघाडी विरुद्ध महायुतीमधील घटकांकडून जाहीर प्रचार सभांमधून याच मुद्द्यांवर काथ्याकूट केला जात आहे.’ खारपाणपट्यातील आरोग्याची समस्या गंभीर असून येथे डायलिसीस युनीट उभारण्यात आल्याचा मुद्दा प्रचारात आहे. सोबतच जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भवनाच्या मुद्द्यासह रस्ते विकास हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने आहेत.रंगतदार लढतीभाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांच्यात चिखलीमध्ये काट्याची लढत होत आहे. जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची लढत असून उभय बाजूंचे राजकीय अस्तित्व येथे पणाला लागले आहे. या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सिंदखेड राजातही डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत असून डॉ. शिंगणेंचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे तर खेडेकर यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.जिल्ह्यात सर्वात कमी ४ उमेदवार असलेल्या जळगाव जामोदमध्ये कामगार मंत्री डॉ. संजय कुटे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांच्यात निवडणूक रिंगणात टक्कर होत आहे. जिल्ह्यातील ही एक रंगतदार लढत असून या लढतीचा निकाल कोणाच्याबाजूने लागतो याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019