शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:10 IST

धाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. 

ठळक मुद्देपांगरखेड येथील घटनागावासह परिसरात पसरली शोककळा 

लोकमत न्यूज नेटवर्कधाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथील नंदकिशोर जाधव  यांना दोन मुले नामे अभय (वय ११) व गौरव (वय ७) हे  गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. अभय हा  चौथ्या  वर्गात तर गौरव दुसर्‍या वर्गात शिकत होता. दिवाळीच्या सुट्या  असल्याने दोन्ही मुले गावाजवळीलच आपल्या गट नं. ६४  मधील शेतात खेळण्यासाठी जात होती. दरम्यान, २८ ऑक्टोबर  रोजीसुद्धा दोन्ही मुले शेतात गेली; परंतु रात्री उशिरापर्यंत परत न  आल्याने घरच्यांनी दोन्ही मुलांची शोधाशोध सुरू केली.  दरम्यान, रात्री १0 च्या सुमारास नंदकिशोर जाधव यांच्या गट नं.  ६४ मधील शेतातील विहिरीत मोठा मुलगा अभयचा मृतदेह  तरंगताना नागरिकांना आढळला. तर गौरवचा पत्ता लागत  नसल्याचे पाहून तब्बल चार विद्युत पंपांनी विहिरीतील पाणी उ पसा करण्यात आल्यावर गाळात गौरवचा मृतदेह आढळला. या  घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी धाड  पोलिसांनी र्मग दाखल केला असून, उत्तरीय तपासणी बुलडाणा  जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्यानंतर शव ना तेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे. पुढील तपास धाड  पोलीस करीत आहे. २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर पांगरखेड  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सैलानी ढासाळवाडी तलावात भाविक बुडालापिंपळगाव सैलानी: बुलडाणा तालुक्यातील सैलानी ढासाळवाडी  तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी भाविक बुडाला असून, त्याचा  पोलीस यंत्रणा व महसूल विभाग शोध घेत आहेत.जालना जिल्ह्यातील कृष्णा काशिनाथ गिरनारे (वय ३0 वर्ष)  हा भाविक सैलानी दग्र्यावर दर्शनासाठी आला होता. तो पत्न ीसोबत सैलानी ढासाळवाडी तलावात पोहण्यासाठी गेला असता  त्याने तलावात उडी मारल्यावर तो वर आलाच नाही, त्यामुळे या  घटनेची माहिती रायपूर पोलीस स्टेशनला दिली. यावरून त्याचा  शोध घेण्यासाठी बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बोटीसह शोधपथक नेमण्यात आले. यामध्ये  बुलडाणा नायब तहसीलदार गणेश माळी, जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, मंडळ अधिकारी विजय  मोरे, तलाठी गणेश वानखेडे, किशोर पाटील, कैलास राऊत,  प्रकाश उबरहंडे, अतुल झगरे, किशोर राऊत, हळदे यांचा  समावेश आहे. या तलावात एका वर्षामध्ये जवळपास १0 ते १२  भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रायपूर  पोलीस स्टेशनने वारंवार घाटनांद्रा ग्रामपंचायतला या तलावावर  येणार्‍या भाविकांकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्याचे  सांगितले; परंतु अद्यापही संबंधितांनी याबाबत नियोजन करून  उपाययोजना केलेल्या नाहीत.

टॅग्स :Crimeगुन्हा