सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:15 IST2021-02-13T11:11:32+5:302021-02-13T11:15:57+5:30

Accident News मृत्यू पावलेल्या दोघांपैकी एक जण वर्धा जिल्ह्यातील तर दुसरा हा मुंबईमधील मलाड भागातील आहे.

Two killed in car-two-wheeler accident on Sindkhedraja-Mehkar road | सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार 

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार 

ठळक मुद्देकारमधील एकाचा व दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.दोन गंभीर जखमींना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
बिबी: सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर लोणार तालुक्यात पिंप्री खंदारे गावानजीक कार व दुचाकीचा अपघात होऊन दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांपैकी एक जण वर्धा जिल्ह्यातील तर दुसरा हा मुंबईमधील मलाड भागातील आहे. अपघातामधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.
लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंप्री खंदारे गावानजीक मारुती मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. यामध्ये  मनप्रीत तेजिंदरसिह नारंग (रा. मलाड, मुंबई) व  अक्षय राऊत (रा. घराळा सेलू, ता. सेलू, जि. वर्धा) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निकिता राऊत आणि त्यांचा मुलगा हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले  आहे. या अपघातामध्ये कारमधील एकाचा व दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी दुपारी एका कारमध्ये (एमएच-३२- वाय-५२३८)  अक्षय राऊत व त्यांचे कुटुंबीय सिंदखेडराजाकडून मेहकरकडे जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने  दुचाकीवर मनप्रीत तेजिंदरसिंह नारंग (एमएच-४७-एम-१३००) हे सिंदखेडराजाकडे जात होते. पिंप्री खंदारे गावानजीक दुचाकी  व कारची दुपारी दीड वाजेच्या सुमारास जबर धडक झाली. त्यात मनप्रीत नारंग यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अक्षय राऊत, निकिता राऊत त्यांचा मुलगा या गंभीर जखमींना बिबी ग्रामीण रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी अक्षय राऊत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमी निकिता राऊत व त्यांचा मुलगा यांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मृत्यू पावलेल्या दोघांचेही पार्थिव हे  बिबी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. बिबी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two killed in car-two-wheeler accident on Sindkhedraja-Mehkar road