बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; तीन गंभीर

By Admin | Updated: June 10, 2017 01:56 IST2017-06-10T01:56:05+5:302017-06-10T01:56:05+5:30

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

Two killed in Buldhana electricity Three serious | बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; तीन गंभीर

बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; तीन गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/चिखली : जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. चिखली व सिंदखेड राजा तालुक्यात वीज पडून दोन ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
चिखली तालुकाभरात ९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात वीज पडून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडली आहे. या घटनेतील जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसर्‍या घटनेत साखरखेर्डा येथील सलीम खान सुभान खान यांचा देखील वीज कोसळून मृत्यू झाला.
तालुक्यात सर्वत्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली.
या पावसादरम्यान तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील नीलेश अंकुश जाधव (वय २१) व सागर मच्छिंद्र जाधव (वय २१) हे दोघे मित्र घरापासून साधारणत: २00 मीटर अंतरावर लघुशंकेसाठी गेले होते. तेथून घराकडे परतत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना नीलेश अंकुश जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेतील गंभीर जखमी सागर जाधव याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साखरखेर्डा येथे वीज पडून एक ठार, दोन जखमी
साखरखेर्डा : येथील इनाम शिवारात ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वीज पडून, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, तिन्ही जखमींना तातडीने बुलडाणा येथे उ पचारार्थ हलविण्यात आले आहे. साखरखेर्डा येथील सलीम खान सुभान खान हे पत्नीसह शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शुक्रवारला सायंकाळी ४ वाजता वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट होत असताना वीज पडली. त्यामध्ये सलीम खान सुभान खान (६0) यांचा मृत्यू झाला असून, शहीदाबी नवाब खान (५0) आणि सानियाबी जमिर खान (९) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Two killed in Buldhana electricity Three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.