शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

शेतरस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:01 AM

खामगाव: शेताच्या रस्त्याच्या वादातून गोंधनापूर व खामगाव येथील रहिवासी असलेल्या दोन गटामध्ये कंझारा शिवारात हाणामारी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देगोंधनापूर व खामगाव येथील रहिवासी असलेल्या दोन गटामध्ये कंझारा शिवारात हाणामारीखामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रार; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेताच्या रस्त्याच्या वादातून गोंधनापूर व खामगाव येथील रहिवासी असलेल्या दोन गटामध्ये कंझारा शिवारात हाणामारी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गोंधनापूर येथील आनंद खेडकर व खामगाव शहरातील नूर कॉलनी परिसरातील डॉ. अक्तारखान जफर उलावत यांच्यामध्ये शेत रस्त्याचा जुना वाद आहे. त्यामुळे रविवारी दुपारी आनंद खेडकर व डॉ. अक्तारखान जफरउलावत यांच्यामध्ये शेत रस्त्यावरून वाद होऊन त्याचे हाणामारीत पर्यावसान झाले. याबाबत आनंद विश्‍वनाथ खेडकर रा. गोंधनापूर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते रविवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये जात असताना त्यांना डॉ. अकतरखान जफर उल्लाखान  रा. नूर कॉलनी खामगाव हे आले व  म्हणाले की हा तुझा रस्ता नाही असे म्हणून वाद घातला.  यावेळी डॉ. अक्तरखान याने डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. तर अझरखान व अफरउल्लाखा या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी अप.नं.३२६/१0 कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला. दुसर्‍या तक्रारीमध्ये जफरउल्लाखान माजीद खान (वय ७१) रा. नूर कॉलनी खामगाव यांनी म्हटले आहे की, मी माझा मुलगा डॉ. अक्तर व दुसरा मुलगा अझरखान असे तिघे जण कंझारा येथील माझ्या शेतात सोयाबीन पिकाची काढणी करण्याकरिता गेलो असता २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२.३0 दरम्यान आनंद विश्‍वनाथ खेडकर, शुभम खेडकर, प्रभाकर खेडकर, रघू खेडकर, रवी सोळंके व इतरांनी मिळून तू आमच्या शेतातला रस्त्यात आडवा का येतो, असे म्हणून गैरकायदेशीर मंडळी जमवून मला व माझ्या दोन्ही मुलांना लोखंडी रॉड व लाकडी राफ्टरने मारहाण करून जखमी केले. अशा आशयाच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी आनंद खेडकर, शुभम खेडकर, प्रभाकर खेडकरसह इतर सर्व आरोपींविरुद्ध कलम १४४, १४७, १४८, १४९, ३२४, ३२६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख यांच्या मार्गदर्शनानुसार पोउनि गाढे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा