बोरी अडगावात दोन गटांत हाणामारी, ४ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 00:03 IST2018-01-17T00:02:41+5:302018-01-17T00:03:00+5:30

खामगाव येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना येथील बस स्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली.

Two groups clash, 4 serious | बोरी अडगावात दोन गटांत हाणामारी, ४ गंभीर

बोरी अडगावात दोन गटांत हाणामारी, ४ गंभीर

खामगाव : येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना येथील बस स्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये १ व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर अन्य तिघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोरी अडगाव येथे जुन्या प्रकरणावरून काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये रामेश्वर नारायण टिकार हे गंभीर जखमी झाले. तर सारंगधर श्रीराम टिकार, अच्युत टिकार व रोशन टिकार हे तिघेसुद्धा जखमी झाले आहेत. या तिघांना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने गावातील तणाव निवळला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Two groups clash, 4 serious