बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोघांचा मृत्यू; एक जण अत्यवस्थ, महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:20 IST2025-09-26T10:18:56+5:302025-09-26T10:20:01+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नायगांव फाट्यानजीकच्या पंपावरील टाक्यात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.तर एक जण अत्यवस्थ झाला त्याला रात्रीच तातडीने येथील आयुष्यमान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोघांचा मृत्यू; एक जण अत्यवस्थ, महामार्गावरील घटना
हनुमान जगताप
मलकापूर जि. बुलढाणा: बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोघांचा तरुणांचा मृत्यू झाला.तर एक जण अत्यवस्थ आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील नायगांव फाट्यानजीकच्या पंपावर दि.२५ रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.गंभीर तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर या घटनेत वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
यासंदर्भात,साजीदखान जलीलखान वय २२ व मुस्ताकखान जब्बारखान वय ३८ अशी मृतकांची नांव आहेत.तर आरिफखान बशिरखान वय ३८ हे अत्यवस्थ तरुणाचे नाव आहे.हे तिघेही मलकापूर येथील पारपेठ प्रभागातील रहिवासी आहेत.दि.२५ च्या रात्री ९.३० च्या सुमारास घरुन बाहेर पडले होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नायगांव फाट्यानजीकच्या पंपावरील टाक्यात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.तर एक जण अत्यवस्थ झाला त्याला रात्रीच तातडीने येथील आयुष्यमान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
या घटनेत रात्री १०.३० च्या सुमारास मृतकांच्या नातेवाईकांना बायोडिझेल पंपावरुन माहिती देण्यात आली. १२ वाजेच्या सुमारास अत्यवस्थ तरुण आरिफखान बशिरखान याला आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर साजीदखा जलीलखान व मुस्ताकखान जब्बारखान दोघा मृतकांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता नायगांव फाट्यानजीकचा बायोडिझेल पंप गत काळात बंद असल्याची माहिती घटनास्थळी लोकांनी दिली आहे.मग पारपेठ प्रभागातील रहिवासी तरुण त्या ठिकाणी पंपाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेले होते कि आणखी काही असेल ? अशा वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.