बुलडाणा तालुक्यात दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:02+5:302021-04-18T04:34:02+5:30

लाकडे जप्ती प्रकरणाची चौकशी धाड : येथे विनापरवाना आडजात लाकडे वाहतूक करून साठवून केल्याप्रकरणी १५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल ...

Two deaths in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात दोन मृत्यू

बुलडाणा तालुक्यात दोन मृत्यू

Next

लाकडे जप्ती प्रकरणाची चौकशी

धाड : येथे विनापरवाना आडजात लाकडे वाहतूक करून साठवून केल्याप्रकरणी १५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील जप्त करण्यात आलेला आडजात माल कोणाच्या मालकीचा असल्यास त्यांनी मालकी हक्काचे वैध दस्ताऐवज वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मास्क वाटप

डोणगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आई तुळजाभवानी संस्थेच्या मार्फत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी खरेदी विक्रीचे संचालक भागवतराव देशमुख, सरपंच पती मिलिंद खंडारे, सुनीलराव दि. देशमुख, जीवनराव वानखेडे व ग्रामस्थ हजर होते.

संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

देऊळगाव राजा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी गावाबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.

गरजूंच्या मदतीसाठी अनेकांचा पुढाकार

बुलडाणा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने काही नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अडचणीच्या काळात त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

क्वारंटाईन असताना बाहेर पडल्यास गुन्हा

लोणार: कोरोना पॉझिटिव्ह असलेले परंतु त्रास नसल्याने अनेक रुग्ण सध्या क्वारंटाईन आहेत. तसेच बाहेरगावाहून आलेल्या नागरिकही होम क्वारंटाईन आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.

पाळीव प्राण्यांची वाहतूक

बुलडाणा : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर रहावे म्हणून गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंध उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. बाजार बंद असला तरीही अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून येते.

वातावरणात बदल; शेतकरी चिंताग्रस्त

दुसरबीड : गेल्या काही दिवसापासून हवामानात बदल झाला आहे. ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

बुलडाणा: ‘कोरोना’ व लसीकरण संदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरविण्यात येत आहे. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

कडब्याचे भाव वाढले

किनगाव राजा : यंदा पावसाने चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कडब्याचे भाव वाढले आहे. ग्रामीण भागातही हीच समस्या असल्याने शहरी भागातील पशुपालकांना चारा मिळत नसल्याची ओरड आहे.

शहरातील रस्ता दुरुस्तीची मागणी

बुलडाणा : शहरातून सागवानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करून देखील दुरुस्ती झाली नाही. आता निधी नसल्याचे सांगून रस्ते कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Web Title: Two deaths in Buldana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.