ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; मुलीसह चालक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 14:05 IST2018-04-29T14:05:52+5:302018-04-29T14:05:52+5:30
कुटुंबातील पाचजणांची प्रकृती गंभीर

ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; मुलीसह चालक जागीच ठार
नांदुरा (जि. बुलडाणा): ट्रकनं इंडिका कारला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय. कारमधील मुलीसह चालक या अपघातात मृत्यूमुखी पडला. सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहराजवळ ट्रकनं इंडिका कारला जोरदार धडक दिली.
धुळे येथील शेख कुटुंब लग्नासाठी अकोल्याला जात होतं. दरम्यान नांदुरा शहरापासून काही अंतरावर आर्शीवाद हॉटेलजवळ एम एच ४० एसी ५३८० क्रमांकांच्या इंडिका कारला समोरून येणाऱ्या ट्रकनं (एम एच २७ एबी-५९९५) जबर धडक दिली. यामध्ये कारमधील मुलीसह चालक जागीच ठार झाला. तर शेख कुटूंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हा अपघात इतका भीषण होता की, चालकाला कारचा काही भाग कापून बाहेर काढावं लागलं..